जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
यावल तालुक्यातील साकळी या गावातील सखाराम दयाराम भिल या ४२ वर्षीय इसम हा गुरुवारी कटुरले तोडण्यासाठी शेतात गेला होता. मात्र, घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या लहान भावाने त्याचा शोध घेतला असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. कुठल्यातरी वन्यजीवाने चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील सखाराम भिल हा इसम गुरुवारी आपल्या घरून शेतात कटुरले तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून निघाला होता. दरम्यान, तो घरी परत आलाच नाही. तेव्हा शुक्रवारी त्याचा भाऊ विनोद भिल याने त्याच्या शोध घेतला असता. सखाराम हा साकळी शिवारातील सूर्यभान जंजाळे यांच्या शेतात मृतावस्थेत मिळून आला. यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासण करून त्याला मृत घोषित केले कुठल्यातरी वन्यजीवाने चाव घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विनोद भिल यांन दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाल हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत. दरम्यान या घटनेने गावात खळबळ उडाली होती.