जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता किरण गायकवाड अभिनयाकडे वळलेल्या या मालिकेने कलाटणी दिली. मालिकेत खलनायक साकारणारा किरण ‘नाद’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा नायक बनला आहे.
प्रकाश पवार दिग्दर्शित ‘नाद’ या चित्रपटाचे नुकतेच भोरमध्ये शूटिंग सुरू झाले असून, याबाबतच माहिती आणि फोटो किरणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात किरणसोबत सपना माने ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे. खलनायक किंवा नायक साकारायल मिळणे हे लेखक-दिग्दर्शकावर अवलंबून असते. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला अभिनयातील दोन्ही टोकाच्या शेड्स रसिकांसमोर सादर करता आल्याने मी स्वतःला भाग्यवान मानतो. माझ्या खलनायकी भूमिकेवर प्रेक्षक खूप संतापायचे. आता लव्हस्टोरीद्वारे त्यांना रोमॅटिक किरण दिसणार आहे.