जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली असून प्रभाग क्रमांक १ मध्ये अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निवडणूक मैदानात ‘छत्री’ चिन्ह घेऊन उतरलेल्या चेतन महाले यांनी अल्पावधीतच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांकडून चेतन महाले यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून, हा प्रतिसाद त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे स्पष्ट संकेत देत आहे. “प्रभागाचा खरा प्रश्न जाणणारा आणि सर्वसामान्यांचा आवाज मांडणारा उमेदवार” अशी प्रतिमा चेतन महाले यांनी तयार केली असून त्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या वाढत्या जनसमर्थनामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्र. १ मध्ये यंदाची निवडणूक तिरंगी न राहता आता अपक्ष चेतन महाले विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.
स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका, थेट जनसंवाद आणि स्वच्छ प्रतिमा व तरुण उमेदवार या जोरावर चेतन महाले यांनी प्रचारात वेग घेतला असून, आगामी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. १ मध्ये ‘छत्री’ किती जोरात बरसते, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.




















