
जळगाव मिरर । ३ मे २०२३
आपण नेहमीच अनेक प्रेम प्रकरणे वाचले असतील किंवा ऐकले असतील पण हे प्रेम प्रकरण वाचून तुम्हाला धक्काच बसेल. लग्नाची बायको असताना बाहेर देखील प्रेयसी असल्याच्या नेहमीच घटना घडत असता पण हि घटना जरा वेगळी आहे. पण एका इसमाने पहिलीच नाही तर दुसरीला सोडून तिसरीसोबत संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे.
काय आहे घटना
छत्रपती संभाजीनगरमधील एका ४१ वर्षीय इसमाने पहिली बायको असताना तिला सोडून दुसरीसोबत राहत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहेत. पण त्यापुढे जाऊन पराक्रम केला आहे. लग्नाची पहिली बायको चार मुलांसह सोडून गेल्याने त्याने दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिच्यापासून एक मुलगी झाली. पण हा बाबा एवढ्यावरच थांबला नाही. घरातून रुसून आलेल्या बायकोच्या अल्पवयीन मैत्रिणीलाही त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे तिला देखील कुमारी माता बनवली. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) याला शोधून बेड्या ठोकल्या आहे. सुभाष फकिरा राठोड असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता ६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.






















