
जळगाव मिरर | १७ जून २०२५
जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगर परिसरातील सिखवाल नगर येथे गेल्या तीन महिन्यापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात धोक्यात आले आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे तरीदेखील याकडे कुठलेही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रजापत नगर परिसरातील शिकवाल नगर या भागात गेल्या तीन महिन्यापासून गटारीचे सांडपाणी ओपन स्पेस मध्ये व नागरिकांच्या घराबाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत या परिसरात कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा काम करत नसल्याचा देखील प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे त्यासोबतच रात्रीच्या सुमारास स्ट्रीट लाईट बंद असल्याने अनेक नागरिक रस्त्याने इजा करीत असताना रस्ते खराब असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे याबाबत तात्काळ जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासनाने यावर कारवाई करावी यासाठी गोपाल व्यास, रामनिवास जोशी, विजय पिंगळे, श्रीकांत दायमा, विक्रम अधवाल यांनी जळगाव मनपा बाबत संतप्त प्रतिक्रिया दिले आहे.