जळगाव मिरर / २० एप्रिल २०२३
सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला असून त्यासाठी अनेक लोक आपल्या घरात थंड हवेसाठी कुलर व एसीचा वापर करीत आहेत. सध्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांसमोर कूलरच कूलर दिसताय. तर जास्तीत जास्त जाहीराती या एअर कंडीशनरच्या आहेत.
ज्यांच्या घरात आधीच कूलर, एसी आहेत, ते चालू लागले आहेत. परंतु एसी किंवा कुलर नेहमी चालू ठेवता येत नाही, कारण तुम्हाला बिल भरावे लागते. शिवाय एसीला तर खूप जास्त खर्च असतो. यासोबतच तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर एकदम गार वातावरणातून उन्हात जाणं खूप कठीण होतं. मात्र आज आपण एका खास एसीविषयी जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एक अशी एसी देखील बाजारात उपलब्ध आहे, जी खरेदी करण्यासाठी फारसा खर्च येत नाही आणि वीज बिलाचंही टेन्शन नसतं. एवढंच नाही तर विंडो, स्पलिट एसी प्रमाणेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे मेन्टेनन्स चार्ज नाही.
आज आपण पोर्टेबल एसी फॅनबद्दल बोलत आहोत. जे तुमच्यासोबत कुठेही नेले जाऊ शकते किंवा तुम्ही ते घर किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही टेबलवर ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे त्याची सुरुवातीची किंमत खूपच कमी आहे. चला काही स्वस्त पोर्टेबल एसी फॅन्सबद्दल जाणून घेऊया.
One94Store पोर्टेबल एअर कंडिशनर फॅन: 500 ml पाण्याची टाकी त्यात उपलब्ध आहे. हे यूएसबी वरून चार्ज करता येते. म्हणजेच ते चालवण्यासाठी तुम्हाला मोठे वीज बिल भरावे लागत नाही. यात 7 रंगाच्या एलईडी लाईट्स आहेत. त्याच्या पाण्याच्या टाकीत तुम्ही जितका बर्फ घालाल तितकी थंड हवा तुम्हाला मिळेल. एकदा टाकी भरली की ती 6-8 तास आरामात चालू शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाणी घालावे लागणार नाही. Amazon वर त्याची किंमत 2,000 रुपये आहे.
Moblios Portable AC: उन्हाळ्यात हे देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. हे एक पर्सनल एअर कूलर आहे आणि ते कुठेही नेले जाऊ शकते. म्हणजेच चालता फिरताही थंड हवेचा आनंद घेता येतो. हा कूलर 3 इन 1 कंडिशनर ह्युमिडिफायर प्युरिफायर मिनी कूलर म्हणून काम करतो. Amazon वर त्याची किंमत रु.1,749 आहे.
Zofey पोर्टेबल मिनी एअर कंडिशनर: हे 500Ml पाण्याच्या टाकीसह येते. त्याची सहज रिफिल करता येणारी टाकी 8 तास टिकते. यामध्ये तुम्हाला 3 स्पीड अॅडजस्टेबल विंड स्पीड मिळेल. ज्या अंतर्गत तुम्ही जोरदार वारा, स्ट्रोक आणि हळू हवा निवडू शकता. Amazon वर त्याची किंमत फक्त Rs.1,299 आहे.