जळगाव मिरर । २८ नोव्हेबर २०२२
देशाला हादरवून टाकणारी घटना दिल्लीत घडली होती तशीच घटना पुन्हा घडल्याने दिल्ली पुन्हा एकदा हादरून गेली आहे. एका महिलेने आपल्या मुलासह मिळून पतीची हत्या केली. त्याचे 22 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. आई आणि मुलगा रात्री तुकडे टाकायला जायचे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सोमवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले. हा खून सहा महिन्यांपूर्वी जूनमध्ये झाला होता. दिल्ली क्राइम ब्रँचने आई-मुलाला अटक केली आहे.
ANI ने जारी केलेले CCTV फुटेज 1 जून 2022 चे आहे. फुटेजमध्ये 12.44च्या सुमारास दीपक हातात बॅग घेऊन फिरताना दिसत आहे. त्याच्या मागे आई पूनमही दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, ते तुकडे फेकण्यासाठी रात्रीच्या वेळी जात असायचे. त्यादरम्यान एका वेळचे हे फुटेज आहे. एक फुटेज दिवसाचेदेखील समोर आले आहे, ज्यामध्ये पोलिस म्हणतात की, ते तुकडे टाकण्यासाठी जागा शोधण्याकरिता बाहेर पडले होते. पोलिसांना आधी पांडवनगरमध्ये मृतदेह सापडला. तो कुजलेला होते आणि त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. दरम्यान, श्रद्धा खून प्रकरणाशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आणि पोलिसांनी या प्रकरणाशी संबंध जोडून तपास सुरू केला. आता तपासादरम्यान पोलिसांना हा मृतदेह पांडव नगरमध्ये राहणाऱ्या अंजन दासचा असल्याचे समोर आले आहे.
पूनमने तिचा मुलगा दीपकसह मिळून अंजनची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. अंजनचे अनैतिक संबंध असल्याचा पूनमला संशय होता. आधी महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर त्याची हत्या केली. त्यानंतर मुलासोबत मिळून मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर पांडव नगर व परिसरात तुकडे फेकले.