• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकीला वाचवण्याच्या नादात जीप विहिरीत कोसळली ; ७ भाविक ठार तर ७ जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 19, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दुचाकीला वाचवण्याच्या नादात जीप विहिरीत कोसळली ; ७ भाविक ठार तर ७ जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जुलै २०२४

राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना – राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पंढरपूरहून परतणारे ६ वारकरी, तर एका प्रवासी महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी पाच जण बदनापूर तालुक्यातील चनेगावचे, एक भोकरदन तालुक्यातील तुपेवाडी, तर एक जण खामखेडा येथील आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भोकरदन तालुक्यातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे १५ दिवसांपूर्वी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे अगस्त ऋषी महाराज तपोवन यांच्या दिंडीत पायी गेले होते. गुरुवारी दुपारी ते पंढरपूरहून एसटीने जालना बसस्थानकावर आले. पंढरपूरच्या यात्रेमुळे बसेसची संख्या कमी असल्याने ते काळीपिवळी (एमएच २१-३८५०) जीपमध्ये बसून राजूरकडे निघाले हाेते. या वाहनात १४ पेक्षा जास्त प्रवासी असल्याचाही संशय आहे. त्यामुळे हे चारचाकी वाहन विहिरीबाहेर काढल्यानंतरही पाण्यात गळ टाकून मृतदेहांची शोधमोहीम उशिरापर्यंत सुरू होती. जालना,भोकरदन व अंबड येथील प्रत्येकी एक अग्निशमन दलाचे वाहनही मदत कार्यासाठी येथे दाखल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच राजूर, तपोवन, तुपेवाडी, वसंतनगर तांडा भागातील रहिवाशांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. दहा ते बारा मिनिटांतच बचावकार्य सुरू केले.

तरुणांनी दोरीच्या साहाय्याने पाण्यात उतरून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींवर उपचारांचा खर्च सरकार करणार आहे, अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनी हे जाहीर केले. जवळपास १४ जण कोंबलेले होते. राजूर ८ किमीवर असताना एका दुचाकीस्वार अचानक जीपसमोर आला. त्याला वाचवण्याच्या नादात जीपचालकाचे नियंत्रण सुटले व भरधाव जीप रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा फूट अंतरावरील कठडे नसलेल्या विहिरीत कोसळली.  पोलिस येण्यापुर्वीच काही मृतदेह तसेच जखमी प्रवाशांना नागरिकांनी विहिरीबाहेर काढले. काही वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले व क्रेनच्या साहाय्याने जीपही बाहेर काढण्यात आली. जखमींना राजूर येथील रुग्णालयात, तर काहींना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गंभीर जखमींची नावे
भगवान मालुसरे (रा. तपोवन), आर. पी. तायडे, सखुबाई प्रल्हाद महाजन (दोघे रा. चनेगाव, ता. बदनापुर), चालक बाबूराव हिवाळे ( मानदेऊळगाव, ता. जालना) हिंमत चव्हाण (तपोवन तांडा,ता. बदनापूर), ताराबाई गुळमकर ( चनेगाव, ता. बदनापूर), अशोक पुंगळे (रा. राजूर, ता. भोकरदन) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

Related Posts

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 19, 2026
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group