जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३
प्रेम खूप नाजूक असते याचा प्रत्यय अनेकांनी देखील अनुभवलेली असतो. काहींनी त्यावर मार्ग काढलेला असतो तर काहींचा मार्गच निघू शकत नाही त्यामुळे प्रेमप्रकरण जास्त दिवस टिकत नसल्याचे काही घटनांमध्ये दिसत आहे. असेच एक प्रेमप्रकरण बंगळुरूमध्ये घडले आहे. नवऱ्याने बायकोला चॉकलेट आणून दिले नाही म्हणून बायकोने टोकाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेली माहितीनुसार, बंगळुरूमधील सहकारनगर येथील एका सलूनमध्ये काम करणाऱ्या गौतमची पत्नी नंदिनी हिने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. तीने आपल्या सुसाईड नोटमध्ये कोणावरही आरोप केलेला नाही. या दोघांचे महाविद्यालयात असतांना ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून पुढील दोघांनी विवाह देखील केला होता. त्याविवाहापासून त्यांना दोन अपत्य देखील होते. नेहमीच पती-पत्नीमध्ये शुल्लक वाद होत असतात, पण ते प्रेमात देखील होतात. घटनेच्या दिवशी कामावर निघालेल्या गौतमला नंदिनीने त्याला थांबवत दोघांमध्ये वाद झाला आणि नंदिनीने गौतमला चॉकलेट आणण्यास सांगितले. चॉकलेट घेऊन परत गौतम येईन असे सांगून निघून गेला, त्यानंतर नंदिनीने कॉल केला असता. गौतमने तिच्या कॉलला उत्तर दित नाही. रात्री 11.45 च्या सुमारास गौतमच्या व्हॉट्सएपवर नंदिनीने मेसेज केला की, ती जात आहे. तिने गौतमला लवकर घरी येण्यास सांगितले आणि मुलांना खाऊ घालण्यास सांगितले, त्यांची चांगली काळजी घेण्यास सांगितलं, घाबरून गौतमने तिला कॉल केला पण तिने कॉल उचलला नाही. घरी पोहोचल्यावर गौतमला पत्नी नंदिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. गौतमने सकाळी घडलेला प्रकार सांगितला. नंदिनीच्या कुटुंबीयांनीही गौतमवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. याप्रकरणी हेन्नूर पोलिसांनी मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.