
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५
केवळ जळगांव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केलेल्या जळगांव शहरातील नामवंत व समाजपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या खडके चाळ श्री.गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ यांनी यावर्षीही बाप्पाची आकर्षक,भव्य व सुंदर मूर्ती बुऱ्हाणपूर येथून सुप्रसिद्ध कलाकार अनंत वैद्य यांच्याकडून आणण्याचे नियोजन केले आहे.
मागील वर्षी मंडळाने विक्रम नोंदवितांना तब्बल 28 फूट उंचीची बाप्पाची छ.शिवाजी महाराज यांच्या रुपातील आकर्षक व सुंदर मूर्ती स्थापन केली होती.यावर्षीही मंडळाच्या सर्व सदस्यांनी जवळपास तेवढ्याच उंचीची बाप्पाची मूर्ती आणण्याचे नियोजन केले आहे.
व मंडळातील कार्यकर्ते बुऱ्हाणपूर येथे 20 ऑगस्ट ला जाणार आहेत 26 ऑगस्ट पर्यंत जळगावात बाप्पा चे आगमन होईल
तरी मागील वर्षी बाप्पाची मूर्ती जळगाव मध्ये आल्यानंतर विजेच्या तारांची व झाडांची मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूप कसरत करावी लागली होती ह्या वर्षी सुद्धा कार्यकर्त्यांना कसरत करावी लागेल असे दिसून येत आहे
गेल्या 15 वर्षांपासून मंडळाने विविध समाजपयोगी कामे जसे की,वृक्षारोपण,रक्तदान शिबिर, अतिवृष्टी झालेल्या भागातील लोकांना मदत अशा विविध समाजसेवी कामे मंडळाने स्वखर्चाने केली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील बाप्पाची भव्य व दिव्य मूर्ती हे गणेशोत्सव 2025 चे प्रमुख आकर्षण असणार आहे असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.
गणेशोत्सवातील दहाच्या दहा दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाने केलेले आहे.त्यात प्रामुख्याने 11,111 दिव्यांची महाआरती,किर्तन,150 सदस्यांकडून सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण,विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक लेझीम पथक ही या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.
मंडळाची कार्यकारणी जाहीर – अध्यक्षपदी. आकाश जाधव उपाध्यक्षपदी. दीपक झुंजारराव सेक्रेटरी.. योगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष.. ललित नन्नवरे खजिनदार. मनोज तिळवणे सह खजिनदार.. गणेश ठाकूर संचालक… आनंद शिरसाळे सहसंचालक.. मनोज पाटील
संघटक.. कल्पेश शिंदे सहसंघटक..मंगेश लोखंडे कायदेशीर सल्लागार.. राजेंद्र सूर्यवंशी . संजय नन्नवरे .उत्तम कोळी.. अनिल पाटिल..संदीप पाटील प्रमुख सल्लागार.. राधेश्याम चौधरी . भाग्यवंत पाटील.. महेश सूर्यवंशी. यश ठाकरे. शुभम पाटील . पवन शेवाळे बंटी पाटील …




















