चाळीसगाव : कल्पेश महाले
गेल्या दोन दिवसाआधी जळगाव जिल्हा हादरेल अशी घटना भडगाव तालुक्यात घडली आहे. मन्न सुन्न करणारी हि घटना उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त होवू लागली होती. त्यानंतर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यानी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
काय घडली घटना
भडगाव तालुक्यातील गौंडगाव येथील सात वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक ३० रोजी रात्री बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी भडगाव पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार केली होती पण दोन दिवसात दिनांक २ रोजी सकाळी त्याच मुलीच्या घराजवळील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगार्याखाली तिचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलीस तपास करीत आहे. या प्रकरणी भडगाव तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, सदरील घडलेल्या प्रकारात ज्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्यचार करीत खून करीत फेकून दिले त्याला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहें.
या निवेदनावर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, रयत सेना, आम आदमी पार्टी, मराठा महासंघ देखील सहभागी झाले असून निवेदनावर अरुण पाटील, कुणाल पाटील, गोरख साळुखे, प्रदीप मराठे, मनोहर सूर्यवंशी, गणेश पवार, खुशाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.