
जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
अकोला जिल्ह्यातील व्यापाराशी संबंधित ८० लाख रुपयांची रोकड पातूर येथील ढाब्यावर उभ्या असलेल्या लक्झरी बसगाडीतून लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळून ७९ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. २६ नोव्हेंबरला रात्री ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील राजू वेलाजी प्रजापती (२६) यांच्या तक्रारीनुसार, ते व्यापाराशी संबंधित ८० लाख रुपयांची रोकड घेऊन खासगी लक्झरी बसने अकोलामार्गे मुंबईला जात होते. लक्झरी बस पातुरातील एका ढाब्याजवळ थांबली होती. राजू प्रजापती हे शौचासाठी खाली उतरले असता, अज्ञात चोरट्याने ८० लाख रुपये असलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन खेखा (ता. मनवार, जि. धार) येथील आरोपी विनोद विश्राम चव्हाण (वय १९) यास ताब्यात घेतले