जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२४
चोपडा शहरातील बसस्टँड परिसरामध्ये उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती गांजा घेऊन फिरत होता. बसने निघून जाण्याच्या तयारीत असताना चोपडा शहर पोलिसांना गोपनीय माहितीनुसार ताब्यात घेतले.
मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून २० रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चोपडा बस स्टैंड परिसरात उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातील दुबारी येथील मजूर रामकिशन मुनीब चौहान (वय २४) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, २१ रोजी चोपडा न्यायालयाने रामकिशन चौहान यास २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत. ही कारवाई पो.नि. मधुकर साळवे, स.पो.नि. एकनाथ भिसे, पीएसआय अनिल भुसारे, रितेश चौधरी, पंकज ठाकूर यांनी केली.