जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून शासकीय विभागातील अनेक कर्मचारीसह अधिकारी टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केशवनगर पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिरसाट ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळतात वरिष्ठ अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत राहुल शिरसाट यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल शिरसाट सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाणार होते. मात्र, त्याआधी राहुल यांनी स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येने शिरसाट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांनी राहुल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.