जळगाव मिरर / ६ ऑगस्ट २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील 23 वर्षीय शेतकरी मंथन राजेंद्र पाटील हा तरुण सहा ऑगस्ट रोजी सकाळी शेतात कामानिमित्त गेला असता दरम्यान या ठिकाणी शेतात काम करीत असताना मंथन यास एका विषारी सर्पाने दंश केल्याने त्याला लागलीच ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तरुणास मृत घोषित केले असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंथन पाटील यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.