• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

डिजिटली दिव्यदर्शनाची अनुभूती देणारी ‌‘व्हीआर‌’ यंत्रणा कार्यान्वित करणारे श्री मंगळग्रह मंदिर देशात एकमेव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
डिजिटली दिव्यदर्शनाची अनुभूती देणारी ‌‘व्हीआर‌’ यंत्रणा कार्यान्वित करणारे श्री मंगळग्रह मंदिर देशात एकमेव
Share on FacebookShare on Twitter

आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
जळगाव मिरर |  ७ मे २०२६
अमळनेर  येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारा व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) प्रकल्प  सुरू करण्यात आला आहे. बुधवार, दि. 6 मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ही यंत्रणा देशात सर्वप्रथम श्री मंगळग्रह मंदिरात कार्यान्वित झाली आहे हे विशेष! मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांच्या शुभ हस्ते मंदिरात ‌‘एआय‌’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्या निमित्ताने श्री मंगळग्रह मंदिर देशातील पहिलेच एआय मंदिर ठरले आहे ही बाबही या निमित्ताने अधोरेखित होते. त्यामुळे आता जगभरातील भाविक व पर्यटकांना श्री मंगळग्रह मंदिरासंदर्भातील डिजिटल अनुभव व समग्र माहिती घरबसल्या घेता येणार आहे.
तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले, ‌‘ग्लोबल महातेज‌’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणीत यंत्रणेच्या माध्यमातून भाविक आणि पर्यटकांना श्री मंगळग्रह मंदिर परिसराचा संपूर्ण आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील विविध देवतांची स्थाने, पूजाविधींची स्थळे, गाभारा आणि परिसर 360 अंशांमध्ये पाहता येणार आहे. घरबसल्या दूरस्थ दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे. मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्राद्वारे तसेच मोबाईल किंवा संगणकावर कोणतेही ॲप डाऊनलोड न करता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईलच्या सहाय्याने सदर यंत्रणेच्या लिंकचे व्यापक प्रमाणात व्हायरलिंग करण्यात येत आहे.
या डिजिटल भ्रमंतीमध्ये मार्गदर्शित आणि स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रवासाचे उत्तम नियोजन करता येणार आहे. वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मंदिराचा अनुभव सहजपणे घेता येणार आहे. अचूक माहिती, बहुभाषिक उपलब्धता आणि आभासी अनुभव जगभरातील पर्यटकांना उपलब्ध करून देत अशा प्रकारची व्यासपीठे पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या प्रसारासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतात, असा विश्वास हा प्रकल्प विकसित करणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  दरम्यान, याच यंत्रणेच्या सहाय्याने मंदिरात मोठ्या संख्येने येणारे भाविक, पर्यटक व त्यांची वाहने यांचेही सुनियोजन करता येणार आहे.
हा प्रकल्प ‌‘इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड‌’ या मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला आहे. डिजिटल प्रतिरूप (डिजिटल ट्विन) तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण, नगररचना आणि अनुभवात्मक पर्यटन उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ड्रोन फोटोग्रॅमेट्री, 360 अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मंदिर आणि परिसराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे. या प्रकल्पाच्या कार्यसंघामध्ये चेन्नई येथील मिथुन आनंद, मुंबई येथील दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group