जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
चार वर्षांपुर्वी चोरलेली दुचाकी सासऱ्याला विक्री करणाऱ्या तन्वीर जमीद पटेल (रा. खडकारोड, पटेलगल्ली) याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी तन्वीरसह त्याचा सासरा त्याचा साथीदार अशपाक सत्तार पटेल (रा. आक्सानगर, रा. भुसावळ) यांच्याकडून चोरलेली एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील मास्टर कॉलनीतील अशपाक सत्तार पटेल यांच्याकडे (एमएच १९, एक्यू ७८६३) क्रमांकाची बुलेट असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संघपाल तायडे, हरीलाल पाटील, गणेश गव्हाणे, विजय पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने बुलेटच्या कागदपत्रांविषयी अशपाक पटेल यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याने ही दुचाकी चार वर्षांपुर्वी त्यांचा जावई तन्वीर मजीद पटेल याने आणून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पथकाकडून तन्वीरचा शोध घेतला जात होता. तन्वीर हा (एमएच १९, एटी ६६९०) क्रांकाच्या दुचाकीवरुन शहरात फिरत असतांना पथकाने त्याला दोन्ही दुचाकींविषयी चौकशी केली.
सासरे व जावई यांना एलसीबीच्या कार्यालयात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तन्वीर याने त्याचा साथीदार आवेश बिसमिल्ला शेख (मणियार) (रा. खडकारोड) याच्या मदतीने चार वर्षांपुर्वी चोरल्याची कबुली दिली. त्यातील बुलेट ही तन्वीर याने त्याच्या सासऱ्याला विक्री केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.