जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरीपुत्र उर्वेश साळुंखे यांनी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी तरुणाने स्वतःच्या रक्ताच्या शाईने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन लिहिले आहे.
गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी उर्वेशने आपले स्वतःचे रक्त काढून त्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे. रक्ताच्या निवेदनात असे म्हटले आहे. की हे धरण पूर्ण झाल्यास किमान जळगाव जिल्ह्यातील पाच ते सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांचा विचार करून राज्य सरकारी व केंद्र सरकारने हे धरण कसे पूर्ण होईल असे लवकरात लवकर प्रयत्न करावे.
उर्वेस साळुंखे हे रक्ताच्या शाहीने निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. तरीही निवेदन देण्यासाठी सतत उर्वेस साळुंखे हे आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत होते. परंतु वेळ काय मिळाला नाही. यामुळे उर्वेश साळुंखे रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे येत्या 20 ते 25 दिवसात उर्वेशला मुख्यमंत्री महोदयांनी वेळ न दिल्यास 26 व्या दिवशी उर्वेश साळुंखे मंत्रालयात उडी घेणार असे म्हणाले. उडी घेताना काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील.