• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला !l

स्पर्धेला जैन फार्मफ्रेशचे अथांग जैन यांची विशेष उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2023
in जळगाव
0
राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला !l
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ करत स्पर्धेत आपली छाप उमटवली. मुलांच्या गटात आज अनेक चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या,

तामिळनाडूच्या जैदंबरीश ने २००० मानांकन असलेल्या तेलंगणाच्या विघ्नेशला ७२ चालीपर्यंत झुंज दिली. तर आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला तो महाराष्ट्र संघातील रायगडचा पारस भोईर, दुसऱ्या पटावर खेळल्या गेलेल्या डावात सेमीस्लाव पद्धतीचा बचाव निवडत महाराष्ट्राच्या पारसने तेलंगणाच्या कँडीडेट मास्टर शैक सुमेरला सुरवातीपासूनच गोंधळात टाकले. पारसची २२ वी उंटाची चाल व २३ व्या चालीतील घोड्याचे बलिदानाने पांढऱ्या सैन्याची संपूर्ण दाणादाण उडाली. ४३ व्या चलीपर्यंत आपला वरचष्मा राखत पारसने या मोक्याच्या क्षणी संधीचे सोने केले आणि स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच पहिल्या पटावर डावाच्या सुरवातीलाच घोड्याची फ-४ सारखी मार्मिक चाल न सापडल्याने मयंकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

पण डावाच्या अंतिम भागात काळ्या उंटाची ब-८ जागेवर चालीमुळे पांढऱ्याच्या दोन्ही प्याद्याना रोखण्यात मयंक यशस्वी ठरला व डाव अनिर्णीत राहिला. सातव्या पटावर तेलंगणच्या पवनने जी पट्टीतील प्यादे पुढे ढकलत विवानच्या हल्ल्याला परतवून लावले व  डावाचा निकाल अनपेक्षितपणे आपल्या बाजूस फिरवला. दिवसअखेर अंतिम वृत्त हाती आले तेव्हा मुलांच्या गटात इम्रान, अर्शप्रीत सिंह व पारस भोईर यांनी ४ गुणांसह आघाडी घेतली असून ९ खेळाडू साडे तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय क्रमांकावर आहेत.मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून धक्कादायक निकालचौथ्या फेरीत मुलींच्या गटात आठव्या क्रमांकावरील पटावर त्रिपुराच्या आर्शिया दासने संहिता पूनगावनमचा अवघ्या २२ चालितच धुव्वा उडवला. तर सुरवी भट्टाचार्य व मोदीपल्ली दीपशिखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या गटात देखील धक्कादायक निकालांची परंपरा चालू ठेवली आहे. पहिल्या पटावरील संनिध्दी भटने काळ्या सोंगट्यांनिशी खेळताना स्कँडनिवियन बचाव पद्धती निवडत, पांढऱ्या राजावर घणाघाती हल्ला चढवला, मृत्तिका चा राजा पटाच्या मध्यभागी जखडून राहिल्याने तिला पराभवाच्या नामुष्की ला सामोरे जावे लागले. अंतिम वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या फेरिअखेर संनिध्दी भट आणि आंध्रा ची आमुक्ता गुंटाका ४ गुणांसह आघाडीवर असून शूभी गुप्ता, अनुपमा श्रीकुमार, जागृती कुमारी, सपर्या घोष व शेराली पट्टनाईक साडे तीन गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत.चौकटनिसर्गरम्य वातावरण पालकांना भावले.

बुद्धिबळ स्पर्धेतील स्पर्धकांना व पालकांना अनुभूती निवासी स्कूलचे निसर्गरम्य वातावरण भावलेले दिसून आले. याबाबत काही पालकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. अनुभूती निवासी स्कूलचा परिसर मोहित करून टाकणारा आहे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीचे आयोजन, त्यांनी पुरवलेल्या सुविधा व निसर्गरम्य वातावरण आम्हा पालकांसह मुलांसाठीही आरोग्यदायी आहे. मनाला शांती मिळण्यास व आजूबाजूच्या हिरवळीने सर्व थकवा निघण्यास विशेष मदत होते असे बंगळुरू चे कृष्णप्रसाद यांनी सांगितले.

Tags: Chess championshipJain farm fresh

Related Posts

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !
जळगाव

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

May 8, 2025
पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !
क्राईम

पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

May 8, 2025
खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !
क्राईम

खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

May 8, 2025
पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू
क्राईम

पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

May 8, 2025
जळगाव मनपाचे दुर्लक्ष : खडके चाळीतील गटारी तुंबल्या !
जळगाव

जळगाव मनपाचे दुर्लक्ष : खडके चाळीतील गटारी तुंबल्या !

May 8, 2025
“कृषी भुषण” पुरस्काराने किरण सुर्यवंशी यांचा सन्मान !
जळगाव

“कृषी भुषण” पुरस्काराने किरण सुर्यवंशी यांचा सन्मान !

May 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

May 8, 2025
पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

May 8, 2025
खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

May 8, 2025
पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

May 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group