
वरणगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १२ सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली.
राहुल मुरलीधर गोसावी (३० ) असे मृत तरुणाचे नाव असून सोमवार रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराचे छताच्या पत्र्याच्या लोंखडी पाईपला सुताची दोरीने गळ्या भोवती गळफास लावून आत्महात्या केली. मयत हा मजुरीने वरणगावातील एका शेतकऱ्याकडे कामास होता. मात्र काही दिवसापासून ते कामावर नव्हता मयत राहुल हा घरात एकटाच राहत होता.
आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशला महेश गोसावी याच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हे कॉ मधुकर भालशंकर हे करीत आहे.




















