जळगाव मिरर । २१ जानेवारी २०२३ ।
तुम्ही मोबाईल वापरत असतील तर तुम्हाला नेहमी अनेक राँग नंबरने फोन येत असतील पण तुम्ही ते फोन टाळत असता पण काही वेळेस तुम्हाला तुमच्या बँकेतून खरोखर फोन येतात तुम्ही त्यावर सुद्धा लक्ष देत नाही मग नंतर समजते कि मागे आलेला फोन बँकेचा होता, असाच एका २३ वर्षीय तरूणासोबत घडले आहे, त्या तरुणाची एका फोनवरून तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जळगाव शहरातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरूण आपल्या परिवारासह सध्या पुणे येथील हिंजेवाडी येथे वास्तव्यास आहे. त्याला दि.१८ व १९ रोजी ८५३५०२६१५६ या नंबरवरून फोन येत तुम्हाला पर्सनल लोन व क्रेडीट कार्डची ऑफर असल्याचे भासवत त्याचा विश्वास संपादन करीत संशयित आरोपीने त्यांना त्याचा ओटीपीची विचारपूस करित त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६० हजार रुपये लंपास करीत त्या तरुणाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत.