• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…तेव्हा ‘स्त्री’चा जग नक्कीच सन्मान करते : ज्येष्ठ निवेदिका सौ.मंगला खाडिलकर यांचे गौरवोद्गार !

चोपड्यात विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात 

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, व्यवसाय, सामाजिक
0
…तेव्हा ‘स्त्री’चा जग नक्कीच सन्मान करते : ज्येष्ठ निवेदिका सौ.मंगला खाडिलकर यांचे गौरवोद्गार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मार्च २०२५

आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री सतत व्यस्त असते; तिच्या मनात एक असंतोषाचे बीज असते, स्त्रीच्या मनात कोंडलेली ही वाफ मोकळी करणे म्हणजेच तिचा योग्य तो सन्मान करणे होय. स्त्री वेगवेगळ्या नात्यात आपल्या कर्तृत्वाचे आणि जीवनाचे सौंदर्य प्रदर्शित करत असते. आपल्याला प्रत्यक्ष जेवढे दिसते त्यापेक्षा स्त्रीचे जग खूप मोठे असते. अनेक दृश्य-अदृश्य नात्यांचे धागे स्त्रीच्या हातात असतात व त्यात ती कायम गुंतलेली असते. समाज तिला कधीही उत्तम अशी पदवी देत नाही पण तिने उत्तम काम करावे ही अपेक्षा मात्र नेहमीच करतो. तिने आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केली की जग तिचा नक्कीच सन्मान करते, असे गौरवोद्गार काढत मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका सौ. मंगला खाडिलकर यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे कौतुक केले.

चोपडा येथील नगरपरिषद नाट्यगृहात चोपडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कैलास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील हे मंचावर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थीतर्फे सौ. रेखा पाटील व डॉ. स्वप्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर डॉ. केतकी पाटील यांनी मनोगतातून पुरस्कारार्थी महिलांचे अभिनंदन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संजय बारी व सौ. योगिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन चोपडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लतीष जैन यांनी केले. विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात २५ महिलांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सौ. मंगला खाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.अरुणभाई गुजराथी म्हणाले, स्त्री म्हणजे सृजनशक्ती, स्फुरणशक्ती, स्मरणशक्ती आणि सहनशक्ती होय. संस्कार आणि संस्कृतीची निर्मिती स्त्रीच्याच ठिकाणी होत असते. आपल्या समाजात माणूस संस्कृती वाढली पाहिजे. विश्व स्वामिनी पुरस्कार म्हणजे गुण, सेवा, कार्य आणि मानवतेचा गौरव असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

विश्व स्वामीनी पुरस्कार २०२५ – पुरस्कारार्थी:
श्रीमती चंद्रकला दत्तात्रय पाटील (सरपंच, चहाडी),सौ नम्रता सचिन पाटील(पुणे,चोपडा), सौ.स्वामिनी निलेश पाटील (ग्रामविकास अधिकारी, अमळनेर), सौ स्वाती योगेश नन्नवरे (शाखा अभियंता, जळगाव), डॉ.सौ. क्रांती संदेश क्षीरसागर (क्रीडा संचालिका, चोपडा कॉलेज),अंजुम रमजान तडवी (सरपंच, मोहरद), डॉ. सौ. नंदिनी पांडुरंग वाघ (प्राध्यापिका, पंकज कॉलेज, चोपडा), सौ अर्चना राजेंद्र पाटील (अध्यक्ष रुद्र अपंग संघटन), सौ सोनाली नारायण पाटील (माजी सभापती, पं. स. चोपडा), श्रीमती इंदिराताई कृष्णराव पाटील (सामाजिक कार्यकर्त्या,वर्डी), सौ रेखा सर्जेराव पाटील (निवृत्त मुख्याध्यापिका,चोपडा), सौ. कविता हेमंत वाणी (संचालिका, रघुवंश ऍग्रो फार्म), सौ लीना राहुल पाटील (चोपडा), डॉ.सौ. नीता विनीत हरताळकर (सोनोग्राफी तज्ञ, चोपडा), सौ आशाबाई रवींद्र पवार (अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा चोपडा), श्रीमती दिपाली रामचंद्र साळुंखे (स्वच्छता निरीक्षक,चोपडा), सौ.कल्पना रमाकांत बोरसे (संचालिका, प्राजक्ता सर्जिकल कॉटन), सौ मनीषा योगेश सोनवणे (संचालिका, नवजीवन सोलर), सौ रत्ना पवन पाटील (सरपंच, मोहिदे), सौ. संध्या नरेश महाजन (माजी नगरसेविका, चोपडा), डॉ. स्वप्ना संदीप पाटील (नाक कान घसा तज्ञ, चोपडा), जयबून बबन तडवी (सेवानिवृत्त पर्यवेक्षिका, पारोळा), सौ नेहा सुहास चौधरी (इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, जळगाव) आणि स्व. सौ. सविता संजीव शिरसाठ (माजी सरपंच,अनवर्दे खुर्द) यांना पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आरंभी मनोज चित्रकथी व विजय पालीवाल यांनी ईशस्त्वन सादर केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चोपडा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदलाल मराठे ,सचिव विलास पाटील, तुषार सूर्यवंशी, तौसिफ खाटीक, विश्वास वाडे, हेमकांत गायकवाड, विनायक पाटील, डॉ. सतीश भदाणे,आकाश जैन, महेश पाटील, ललित कोळी यांनी परिश्रम घेतले.

श्रीमती कुमुदिनी गुजराथी यांना जीवन गौरव पुरस्कार

येथील चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व चोपडा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी यांच्या मातोश्री व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुमुदिनी नटवरलाल गुजराथी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘विश्व स्वामिनी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group