
जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।
हिंदू धर्मात महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे अक्षय्य तृतीया या दिवशी सोन्याची खरेदी करीत असतात अशी परिवारातील जुन्या सदस्याची समज आहे. त्यासोबतच या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. यावर्षी हा सण २२ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा दिवस जवळ येताच सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच लोक या दिवशी चांदी आणि हिऱ्यांची खूप खरेदी करतात. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झाला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक मोठ्या ज्वेलर्सनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने खास ऑफर आणल्या आहेत. अक्षय्य तृतीयेच्या विशेष प्रसंगी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक ज्वेलरी ब्रँड्सनी त्यांच्या मेकिंग चार्जेसवर 50% पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत सोने आणि हिऱ्याच्या दोन्ही दागिन्यांवर उपलब्ध आहे.