जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२४
भुसावळ येथील मंडळ कॉलनी मधील बंद घरात घरफोडी करून दोन लाख 69 हजाराचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. संशयित आरोपीचा बाजारपेठ पोलिसांनी शोध घेत 12 तासात मुद्देमालासह अटक केली. दि. 29 जुलै रोजी रामप्रसाद गोपाल चंदन (वय ७०) रा. गुंजाळ कॉलनी भुसावळ यांच्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन त्यांच्या घरातील 2 लाख 69 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रुपये चोरुन नेले होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधीकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणने बाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
भुसावळ बाजारपेठ पोलिसाचे डी. बी. पथकातील पो उप निरी. मंगेश जाधव, पो हे कॉ. विजय नेरकर, पो. हे. कॉ. निलेश चौधरी, जावेद शहा, राहुल वानखेडे, योगेश महाजन, सचिन चौधरी असे अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना पो, हे. कॉ. विजय नेरकर, पो. हे. कॉ. निलेश चौधरी यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी बाबत माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ संशयित आरोपी जावेद शेख शकील वय 25 वर्ष रा. रामदास वाडी खडकारोड भुसावळ यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये गुन्ह्यातील चोरी गेलेला माल 2 लाख, 69 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रुपये हस्तगत करण्यात आले.
