जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
शहरातील अयोध्या नगरातील घरासमोर दुचाकी लावून गेट उघडणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पोत चोरून नेली. मात्र ती पोत बेन्टेक्सची असल्याने महिलेने तक्रार दिली नाही. हा प्रकार २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडला.
सविस्तर वृत्त असे कि, अयोध्यानगरातील स्वाती अनिल इंगळे घराजवळ आल्या व दुचाकी लावून गेट उघडत असताना मागून दुचाकीवर दोन जण आले. त्यातील एकाने महिलेच्या गळ्यातील पोत ओढली व ते पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र ही पोत बेन्टेक्सची असल्याचे महिलेने सांगितले व तक्रारही दिली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.




















