जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे भरवस्तीत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मात्र, या घटनेत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसून एक चोरटा सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. दरम्यन, ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारात अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागच्या बाजूस बोळात असलेल्या खिडकीचे गज कापून बँकेत प्रवेश केला. परंतु, पैसे असलेली तिजोरी चोरट्यांना उघडताच आली नाही. त्यामुळे चोरट्यांचा डाव अयशस्वी ठरल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. ही घटना सकाळी लक्षात आली. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात शाखा व्यवस्थापक विजय पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय कणखरे, पो.हे. कॉ. किरण तायडे, काझी, पो.पा. एकनाथ सपकाळ, पो.पा. किशोर बोरोले यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, या घटनेत चोरट्यांच्या हाती काहिच लागले नसल्याने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
३ जानेवारीला मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांनी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बँकेच्या मागील बाजुस असलेला विजेचा बल्ब काढला. हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य सुनील भिरूड यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. यासंदर्भात पोलीस पाटील किशोर बोरोले यांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली. भरवस्तीत असलेल्या बँकेत चोरी चोरट्यांनी प्रयत्न केल्यामुळे फेकरीतील नागरिक मात्र चांगलेच धास्तावले आहेत.