
जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी व मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडत असून नुकतेच शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन व्यकीकडून ८ हजार रुपये प्रत्येकी दोन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील सुरक्षा नगरातील ५६ वर्षीय बाळासाहेब भिका पाटील हे दि. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावरून पायी जात असतांना त्यांच्या खिश्यात मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत शहरातील प्रजापत नगर परीसारातीली कुंभारवाडा येथील रहिवासी रिक्षाचालक प्रविण निंबा पाथरे (वय-३५) हे १० रोजी ७.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ रिक्षाजवळ उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी देखील जळगाव शहर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. राजकुमार चव्हाण हे करीत आहे.