
जळगाव मिरर / १३ ऑक्टोबर २०२२
राज्यात सध्या टेलिव्हिजनवर हास्य जत्रेच्या माध्यमातून धुमाकूळ घालणारी अभिनेत्री सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीच तिचे चाहते कौतुक करत असतात. अभिनेत्री आणि कवयत्रि अशा दोन्ही प्राजक्ता सांभाळत “प्राजक्तप्रभा” नावाचं पुस्तकही प्रकाशित केलं. महाराष्ट्रभर प्राजक्ताची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोजण्यापलिकडची आहे. अशाच एका चाहत्यानं प्राजक्ताला खुलेआम प्रपोज केलंय.
प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तिच्यावर प्रेम करणारे आणि तिला ट्रोल करणारे फॉलोअर्सही तिथे पाहायला मिळतात. रानबाजार वेब सीरिज प्रदर्शित झाली तेव्हा प्राजक्ताला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र अभिनेत्री न घाबरला ट्रोलिंगचा सामना केला आणि सडेतोड उत्तरं दिली. पण आता तर प्राजक्ताला चाहत्यानं खुले आम प्रपोज केलंय.
अभिनेत्री सोशल मीडियावर दररोज तिचे नवे फोटो शेअर करत असते. त्यावर हटके कॅप्शन्सही पाहायला मिळत असतात. प्राजक्तानं आज फोटो शेअर करत “इतर कोणाच्याही सावलीच्या मागे जाण्यापेक्षा ती अंधारात एकटीच चालेल”, असं कॅप्शन शेअर केलं. सोबत तिचा हास्यजत्रेच्या मंचावरील ग्लॅमरस फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं.
या पोस्टच्या खाली एका चाहत्यानं प्राजक्ताला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतं प्रपोज केलंय. त्यानं म्हटलंय, “मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा ब्यूटी क्वीन. मी पण तुझ्यावर प्रेम करतो”. चाहत्याच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.