जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२५
पत्नी माहेरी गेलेली व आई घराबाहेर बसलेली असताना शिवदास रामा पाटील (३४, रा.विटनेर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शिवदास पाटील यांचे नापिकीमुळे मोठे नुकसान झाल्याने ते चिंतेत असायचे. त्यांची पत्नी माहेरी गेलेली होती. शनिवारी रात्री त्यांच्या आई घराबाहेर बसलेल्या होत्या. त्यावेळी घरातील सर्व दिवे (लाइट) बंद करून पाटील यांनी गळफास घेतला. घरात अंधार असल्याने त्यांच्या आईने शेजारील एकाला विजेविषयी पाहण्यासाठी सांगितले. त्याने घरात दिवा लावताच शेतकऱ्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले



















