जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
उद्याेग जगताला उद्भवणाऱ्या समस्यांवर महाराष्ट्र चेंबर्सआॅफ काॅमर्सतर्फे राज्यभर दाैरे करून माहिती घेतली जातेआहे. त्या निमित्त ते गुरुवारी शहरात आले हाेते. या वेळी महाराष्ट्र चेेंबर्सआॅफ काॅमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली
ललित गांधी म्हणाले कि, उद्योगामध्ये महिलांना संधी देण्यासाठी राज्यभर आता महिला अभियान होणार आहे. ती यात्रा जळगावातहि येणार आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यत पोहचविण्याचा मानस देखील आहे. त्यासह सुमारे दाेन वर्षांपासून खंडित विमानसेवा फेब्रुवारी २०२३ पासून पुन्हा सुरू हाेणारआहे. पुणे, मुंबई, इंदूर व अहमदाबाद हे चार शहर टप्प्याटप्प्याने विमानसेवेने जाेडली जाणारआहेत. स्टार एअरवेज कंपनीने यासाठी तयारी दर्शवलीआहे. त्याच बराेबरीने पुण्यासाठी चार लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना लवकरच जळगाव स्थानकावर थांबा मिळणार असल्याचेहि त्यांनी सांगितले.
जळगावच्या खंडित विमानसेवेबाबत स्थानिक उद्याेजक व व्यापाऱ्यांकडून चेंबर्सकडे समस्या मांडण्यात आल्या. त्याचा पाठपुरावा काही महिन्यांपासून सुरू हाेता. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सिंधिया यांची गेल्या महिन्यात भेट घेण्यातआली हाेती. त्यानंतर इंडिगाे व स्टार एअरवेजसाेबत बैठक हाेऊन स्टार एअरवेजचे संजय घाेडावत यांनी विमानसेवा सुरू करण्याचे मान्य केलेआहे. ही सेवा फेब्रुवारी २०२३पासून सुरू केली जाणारआहे. पहिल्या टप्प्यात पुणे शहरासाठी विमानसेवा सुरू केली जाईल. त्यानंतर उर्वरित शहरांना सेवेने जाेडले जाईल.
विमानसेवेसाेबत पुण्यासाठी रेल्वे गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा मिळण्यासाठी चेंबर्सतर्फे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याआठवड्यात भेट घेण्यातआली. त्यांनी त्याला तत्त्वत: मान्यता दिली. त्यानुसार दुरांताे एक्स्प्रेस, गरीब रथ, हमसफर व दानापूर या चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव रेल्वेस्थानकावर पुण्यासाठी थांबा देण्यात येणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. ८० सीटर एअरक्राॅफ्टमध्येआता बिझनेस क्लास स्टार एअरवेज ८० सीटर चार नवीन एअरक्राफ्ट घेतआहे. ते जानेवारी महिन्यात दाखल हाेणारआहेत. ताेपर्यंत उर्वरित प्रक्रिया पार पडून फेब्रुवारीत प्रत्यक्ष विमानसेवा कार्यान्वित हाेईल. या विमानांत एटीअारप्रमाणे बिझनेस क्लास असणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली.