जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बदल्या केल्या आहेत. दोघा अधिकार्यांची प्रशासकीय कारणातून तर चौघांची रीक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्यांनी तातडीने बदली ठिकाणी रूजू होवून पदभार स्वीकारावा, असे बदली आदेशात नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहुबणारे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू बबन आव्हाड यांची जळगाव जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संदीप सुरेशसिंग परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. निंभोरा, ता.रावेर येथील गणेश रामदास धुमाळ यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली झाली असून त्यांच्या जागी अमळनेरचे हरीदास शिवराम बोचरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमारर अडसुळ यांची रावेर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक लिलाधर कानडे यांची पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून जळगाव शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक डी.डी.इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, जळगाव नियंत्रण कक्षातील गणेश सुकदेव चव्हाण यांची अहमदनगर येथे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.