जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोझलँड मराठी मिडीयम स्कूल तर्फे कविवर्य ना. धो . महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मौन पाळून विद्यार्थ्यांनी ना. धो महानोर ह्यांच्या कवितांचे वाचन करून श्रद्धांजली वाहिली. तसेच शिक्षकांनी रानकविंची माहिती देऊन काव्य सादरीकरण केले, आणि विद्यार्थ्यांना स्वरचित कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.
याप्रसंगी शाळेने आंतरशालेय रानकवी महोत्सव 2023 आयोजित करण्याचे निश्चित केले .या महोत्सवात 16 सप्टेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 पर्यंत च्या कालावधीत काव्यवाचन घेण्यात येईल .जळगांव येथील सगळ्या शाळांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे . सदर महोत्सवाचे माहितीपत्रक लवकरच सर्व शाळांना देण्यात येईल .