
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना दि.२७ रोजी शहरातील राधाकृष्ण नगर परिसरातील चौकात सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी आ.राजुमामा भोळे व सरिताताई कोल्हे व मान्यवरांच्या उपस्थितीत पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यामध्ये मृत पावलेल्या शहिद भारत वासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ऍड. निलेश जाधव व संपूर्ण परिसरातील नागरिकां तर्फे सायंकाळी ६ ते ८ मध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वॉर्ड क्रमांक १ मधील सर्व नागरिकांनी तसेच जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिति दिली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ.श्री राजुमामा भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सरिताताई कोल्हे,ईश्वर मोरे पिंटू सपकाळे दिग्विजय तिवारी ऍड.अभिजीत रंधे,शाम पाटील,शरद सोनार,सुभाष पाटील,ऍड.येवले सर,कांतीलाल दुसाने, आशिष बाविस्कर मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे व आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन नित्या फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. निलेश जाधव यांनी केले होते. तसेच श्रद्धांजली अर्पन करण्यासाठी हिमांशु हिंगू,महेश जोगी दीपक चौधरी प्रफुल गायकवाड आकाश मोरे अमोल सोनार, संगीता पाटील, आशिष बाविस्कर,मोहित जाधव हर्षल पाटील ऋषिकेश चंदनकर हरीश जोगी,रोहित शिरसाठ लखन तिवारी श्री ऍड. दीपक सोनावणे, अनिल सोनावणे नवल सपकाळे, कैलास जैन, मनोज पोकळे, साहेबराव पाटील, अनिल साठे भीमराव मराठे, किरण चौधरी, दौलत सोनावणे, संजय वानी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.