
लोहार ता. पाचोरा : प्रतिनिधी
स्वात्रंत्र्याचा अमृत महोस्तवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने भारत सरकार अंतर्गत ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’चे अभियामाची जनजागृती करण्यासाठी लोहार येथे दि.१३ ऑगस्ट रोजी तरुणांनी दुचाकी रॅली काढून जनजागृती केली.
लोहारा गावासह परिसरात हर घर तिरंगा हे अभिनयानं घरा – घरापर्यंत पोहचविण्यासाठी येथील तरुणांनी ‘तिरंगा दुचाकी’ रॅली काढत परिसर घोषणांनी दुमदुमला होता. यावेळी रमेश लिंगायत, शरद सोनार, कैलास चौधरी, विकास देशमुख, उमेश देशमुख, अतुल कोळी, शाम पालेवाल, मोती गुजर, गजानन गोंधळे , संजय पाटील, प्रवीण चौधरी व गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




















