
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
जामनेर तालुक्यातील पहूरपासून ५-६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव गोलाईत, ता. जामनेर येथे जामनेर पहूर रस्त्यावर तिहेरी वाहनांचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यात दोन जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मयतांची नावे कळू शकली नाहीत.
पिंपळगाव गोलाईत येथे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना घडली. यात दोनजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व मयतांना पहूर पोलिसांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील यांनी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य केले. रस्ता बंद झाल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे बराच वेळ पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते..





















