जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२५
जगभरातील भाविक प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात मोठी गर्दी करीत असून याठीकानाहून परतणार्या आंध्र प्रदेशातील प्रवासी बसला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात सात भाविक ठार झाले आहेत. जबलपूरमधील मोहला-बर्गीजवळ आज दि. ११ सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आंध्र प्रदेशमधील भाविक महाकुंभसाठी प्रयागराजला गेले होते. आज सकाळी ते बसने परतीचा प्रवास करत होते. मोहला-बर्गीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर ट्रकने बसला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, सात भाविक जागीच ठार झाले. जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.