जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२५
माझ्याकडे खुन्नस देवून का बघतो म्हणत दोन मुलांमध्ये वाद झाले. या वादातून मुलासह त्याच्या आईला बापलेकांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड उचलून मारत असतांना तो डोक्याला लागून जखमी झाले. ही घटना दि. ८ रोजी सायंकाळी ७ वाजता कुसुंबा गावातील विठ्ठलमंदिराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात ललिता शिवाजी पाटील (वय ३७) या वास्तव्यास आहे. दि. ८ रोजी त्यांचा मुलाला प्राण पाटील हा खून्नस देवून घुरुन बघत होता. यावेळी राजेंद्र पाटील याने तु माझ्याकडे का बघतो असे विचारले. त्याचा राग आल्याने प्राण पाटील याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रसंगी ललिता पाटील या मुलाला वाचविण्याकरीता आल्या असता, त्यांना प्राण पाटील याचे वडील संजय पाटील याने महिलेला शिवीगाळ केली. जमिनीवरील दगड उचलून मारत असतांना तो ललिता पाटील यांच्या डोक्याला लागून त्या जखमी झाल्या. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार प्राण संजय पाटील व त्याचे वडील संजय पाटील दोघ रा. कुसुंबा, ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे
