
जळगाव मिरर । ९ जून २०२३

चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील शेतकरी राजेंद्र सुखदेव जाधव (पाटील) यांचा त्यांच्या चिंचखेडे शिवारातील शेतात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून दोरखंडाने फाशी देवून खून करण्यात आला होता. अघटनेनंतर मयत शेतकरीचा मोठा मुलगा मुकेश राजेंद्र पाटील याने मेहूणबारे पोलीस स्टेशनला ‘माझ्या वडीलींचा कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची’ तक्रार दिली होती. या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहुणबारे पोलीसांनी आठ तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. सदर खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी जिल्हा पोलीस यंत्रणेला योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणणे कामी मार्गदर्शन व सूचना केल्या.
गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देणारे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहा अप्पर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली. तेथे आढळून आलेले भौतिक पुरावे व रक्ताने माखलेल्या लाकडी काठ्या दोरी तसेच कांदा चाळीचे तुटलेले कुलूप व तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या यांचे बारकाईने निरीक्षण केले.
दरम्यान खूनाचा बनाव केल्याचे दिसून येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सदर ठिकाणी तळ ठोकून सर्व तपास पथकांना त्या दृष्टीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी हजर असलेले मयतांचे मुलांकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांचे जबाबमध्ये आढळून आलेली विसंगती वरून मयताचा मोठा मुलगा फिर्यादी मुकेश राजेंद्र पाटील वय 23 व राकेश राजेंद्र पाटील व 21 यांना चौकशी कामी ताब्यात घेतले.
गुन्ह्याबाबत विचारपूस करता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र त्यांना अधिक विश्वासात घेऊन कसून तपास करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जबाबात ‘आमचे वडील राजेंद्र सुखदेव पाटील हे आमच्या आईकडून व आमच्याकडून दररोज शेतीमध्ये काबाडकष्ट करून घेत असत परंतु आम्हाला घर खर्च, कपडे अथवा वैद्यकीय उपचाराकरिता वेळोवेळी पैसे मागून देखील देत नसल्याने, तसेच वारंवार आईला व मुलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने वडिलांचा काटा काढण्याचा कट केला असल्याचे सांगितेल.
दोन्ही मुलांनी दिनांक ८ जून रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास वडील शेतामध्ये एकटे झोपलेले असताना मुकेश राजेंद्र पाटील व राकेश राजेंद्र पाटील यांनी मळ्यात मोटरसायकलवर जाऊन वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने गंभीर दुखापत करून नंतर दोरीच्या साह्याने गळा आवळून खून करून परत रात्री घरी येऊन झोपले.
सदरचा खून कोणीतरी अज्ञात इस्मानी कपाशी चोरण्याच्या इराद्याने केल्याचा देखावा तयार केल्याची देखील कबुली दिली. यातील फिर्यादीच आरोपी म्हणून तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पुढील तपास चालू आहे.
यांनी बजावली कामगिरी !
सदर खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात माननीय अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे मेहुनबारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, पोलीस प्रकाश चव्हाणके, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, मेहुनबारा पोलीस स्टेशन सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शिंदे, पो.हे. सुभाष पाटील, दिलीप सोनवणे, योगेश मांडोळे, गोरख चकोर, कमलेश राजपूत, भूषण बाविस्कर, दीपक महाजन, निलेश लोहार, योगेश बोडके, प्रवीण पाटील, हनुमंत वाघोरे, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर बडगुजर, दीपक नरवाडे, शैलेश माळी, होमगार्ड महेंद्र पवार, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील यांच्या पथकाचे मेहनत घेऊन कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला आहे.




















