जळगाव मिरर । १२ जानेवारी २०२३ ।
जळगाव विमानतळावर वावर असलेल्या बिबट्या व दोन बछड्यांना वनविभागाने पिंजरे लावून पकडले. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, विमानतळ परिसरात बिबट्या व तिच्या बछड्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली होती. विमानतळ प्रबंधकांनी उपाययोजना करण्याबाबत वनविभागाला सूचीत केले होते. त्यानुसार वनविभागाने विमानतळ परिसरात जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात ५ जानेवारी रोजी बिबट्या व दोन बछडे असल्याचे आढळून आले. त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्यात बिबट मादी व दोन बछडे कैद झाल्याने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या कार्यवाहीत सहायक वनसंरक्षक यु.एम. बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी एन.ए. बोरकर, वनपाल संदीप पाटील, जी.एस. चौधरी, वनरक्षक उल्हास पाटील, दीपक पाटील, चिंचोले, अजय रायसिंग, संभाजी पाटील, भरत बाविस्कर, चव्हाण, योगेश पाटील यांचा सहभाग होता. वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनाखाली व मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली.