
जळगाव मिरर | ४ मे २०२५
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काउंटरवर पैसे देताना धक्का लागल्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला दोघांनी मारहाण केली. यात तरुणांच्या खिशातील ७ हजार रुपये गहाळ झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरातीला फैजपुर रस्त्यावरील हॉटेल भाग्यश्रीमध्ये काउंटरवर बिल देत असताना धक्का लागला. यच कारणावरून वाद झाला. तर या वादातून बोरावल बुद्रुक येथील ईश्वर सोमनाथ कोळी (वय ३८) या तरुणाला यावल येथील आकाश बिऱ्हाडे व युगल चौधरी यांनी शिविगाळ करून मारहाण केली. तसेच त्याला ओढून बाहेर आणले तसेच त्याला मारहाण करतांना त्याच्या खिशातील ७ हजार रुपये ही गहाळ झाले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हवालदार नीलेश चौधरी करत आहेत.




















