जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२४
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन सात गावठी कट्टे जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरुन २० रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान हातेड ते लासूर रस्त्यावरील पाटाच्या चारीजवळ पोलिसांनी सापळा लावला होता. या वेळी मध्य प्रदेशातील पार उमर्टीकडून दुचाकीवर येणाऱ्या मनोज राजेंद्र खांडेलकर (वय २४, रा. जुळेवाडी कराड, सातारा) व सागर सरणम रनसौरे (वय २४, रा. धायरी, पुणे) यांची चौकशी करण्यात आली. या वेळी त्यांच्याजवळ ७ गावठी बनावटीचे कट्टे, १० जिवंत काडतूस मिळून आले. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या मुद्देमालासह त्यांच्या ताब्यातील एक दुचाची, २ मोबाईल, ७०० रूपये रोख असा एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस राकेश पाटील यांच्या फिर्यादिवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.