जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२३
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूलावर कार व मोटारसायकल यांच्यात धडक झाल्याने मोटारसायकल स्वार जागेवर ठार झाला तर चारचाकीतील दोघे जण आणि मोटारसायकल वरील मागील युवक गंभीर झाल्याची घटना ऐन दसऱ्याचे दिवशी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे श्रीकृष्ण नगर परीसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान जळगाव चौफुली जवळील श्रीकृष्ण नगर परीसरातील रहिवासी असलेले भुषण संतोष हटकर (वय – २०) व प्रविण नाना हटकर (वय – २२) हे दोघे मित्र मोटरसायकल (पल्सर) एम. एच. १९ – ई. डी. २१९६ वरुन घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुली कडून एम. एच. १५ – बी. एन. १०३५ मधील दोघेजण भडगाव रोडकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले यात मोटारसायकल स्वार भुषण संतोष हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याचे मागे बसलेला प्रविण नाना हटकर याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. व चार चाकी वाहनातील देशमुखवाडी परीसरातील दोघ इसम गंभीर जखमी झाले.
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मयत भुषण संतोष हटकर हा खाजगी व्यक्तीकडे सेंडीग कामावर मजूरी करत होता त्याचे पाच्छात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे, तर जखमी प्रविण नाना हटकर हा आई वडीलास एकुलता एक मुलगा असून तो बाजार समितीत हमाली काम करतो. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले