
जळगाव मिरर | ७ जून २०२३
जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे असे असताना शहरातील फुले मार्केट परिसरातील मुख्य बाजारपेठेतून दुचाकी लंपास केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कानळदा रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी प्रशांत मोहन बडगुजर यांच्या मालकीची दुचाकी दिनांक २१ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात असलेल्या काँग्रेस भवन जवळ लावलेले असताना दुचाकी क्रमांक एम.एच.यु.१२ जे.टी ३४२२ या क्रमांकाची दुचाकी २० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रफुल धांडे हे करीत आहे.