जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२५
श्री क्षत्रिय शिंपी समाधीत वर्धक संस्था आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त बैठकीत शिंपी समाजाच्या २०,००० समाजबांधवांच्या गणनेसाठीच्या विशेष फॉर्मचे विमोचन करण्यात आले. ही बैठक जळगाव येथील श्रीमती मनोरमाबाई जगताप कला-सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० वाजता समाजाध्यक्ष श्री विवेक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत येणाऱ्या अखिल भारतीय शिंपी समाज अधिवेशनासाठी जळगाव शहरातून अध्यक्षपदाचा उमेदवार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिंपी समाजाचे प्रतिनिधित्व महापालिकेत निश्चित व्हावे यासाठी समाजातील इच्छुक उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
गणनेच्या फॉर्मच्या विमोचन कार्यक्रमात समाजाध्यक्ष विवेक जगताप, कार्याध्यक्ष मनोज भांडारकर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, अ.भा. सहसचिव संजय जगताप, पिंप्राळा संस्था अध्यक्ष ऋषिकेश शिंपी, नामसंस्कार फाउंडेशनचे उपाध्यक्ष कुणाल बागुल, स्वयंस्फूर्त संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र, हितवर्धक संस्थेचे सहसचिव दीपक जगताप, वसतिगृह प्रमुख प्रदीप शिंपी, प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनवणे, महिला अध्यक्षा सौ. माधुरी शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव शहरातील पिंप्राळा, मेहरूण, जुने जळगाव, खेडी, गणेश कॉलनी, शिवाजीनगर, बिबानगर, अयोध्यानगर, रामानंदनगर, शिवकॉलनी, वाघनगर, असोदा रोड, कांचननगर, बालाजी पेठ आदी परिसरांतील २०,००० समाजबांधवांची खाणे-गणना करण्याचा संकल्प या वेळी सर्व संस्थांनी एकजुटीने व्यक्त केला.
बैठकीस संत नामदेव नामसंस्कार फाउंडेशन, स्वयंस्फूर्त शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था (दादावाडी), हितवर्धक संस्था, तसेच विविध शाखाध्यक्ष, महिला-युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी येणाऱ्या अधिवेशनासाठी आणि महापालिका निवडणुकांसाठी समाज संघटन दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.





















