
जळगाव : प्रतिनिधी
देशाच्या हिरक महोस्तवानिमित्त जळगाव जिल्हा कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक संघटक यांच्याकडून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील जळगाव जिल्हा कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक संघटक यांच्याकडून १५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी १० वाजेपासून बळीराम पेठेतील कार्यालयात राष्ट्रीय तिरंगा ध्वज मानवंदना,शहीदांना श्रद्धांजली, जिल्हा कॉन्सिल बैठकीत संघटन पर विषयांवर चर्चा करणे. देशातील आर्थिक विषमता. श्रीमंत आणि गरीबांमधील वाढते अंतर कमी करण्यासाठी शपथ घेतली जाईल असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविनार आहे.
या स्वतंत्रता दिवसानिमित्त सर्व जिल्हा कौन्सिल सदस्य कार्यकर्ते व सर्व AITUC CITU युनियन असोसिएशन यांनीही कार्यक्रमात आदी उपस्थित राहणार आहे. असे आव्हान जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड. डी एन. पाटील. कॉम्रेड, राजेंद्र झा. राष्ट्रीय आयटक संघटक चे सेक्रेटरी व वरिष्ठ नेता. कॉ. देविदास बोदडे. कॉ. जेडी. ठाकरे. यानी केले आहे.




















