जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२३
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशन गणेश मंडळ संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या नेतृत्वात यंदा तिसरे वर्ष साजरे करीत मंडळीतील कार्यकर्ते व गणेश भक्तांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
सदरील बैठकीत या वर्षीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचे ठरले असून नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी – आशिष राजपूत उपाध्यक्ष – अभिषेक राजपूत , गौरव डांगे, संकेत म्हस्कर, सचिव-मयूर डांगे सदस्य-यश जाधव,मंगेश मांडोळे, उमेश पाटील, आकाश राजपूत, लोकेश निकम, यांची निवड संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केली यावेळी मंडळाचे ज्येष्ठ तसेच तरुण सदस्य यांची उपस्थिती होती.