जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरचा आज विराट कोहलीने मोडून काढला आहे. मुबंईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडा या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
THE GREATEST MOMENT IN ODI HISTORY. pic.twitter.com/IA8QTDaV3g
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने भीमपराक्रम केला आहे. या डावात त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने या सामन्यात १०६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केल. हे त्याच्या वनडे कारिकिर्दीतील ५० वे शतक ठरले आहे.यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सचिनला मागे सोडत शतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ईडन गार्डन्सच्या मैदानावर त्याने ४९ वं शतक पूर्ण करत वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती.