
जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३
जळगाव एमआयडीसी सेक्टरमधील मनपाच्या ३३ के.व्ही. वाघूर वीज वाहिनीचे फिडर देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाघूर पंपिग व फिल्टर प्लॅटचा वीज पुरवठा २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ते दुपारी ४ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे २६ रोजी शहरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. चालू महिन्यात ५ ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
पंधरवाड्यात हा दुसरा प्रकार आहे. वेळापत्रकानुसार शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही मनपाने केले आहे.
तर २७ ऑगस्टपासून पाणी पुरवठा – खंडेरावनगर दुसरा दिवस – पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, दुसरा दिवस शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग.





















