जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२५
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार, शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होईल. मंगळवारी होणारा पाणीपुरवठा आता बुधवारी ८ जानेवारी रोजी होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाणीपुरवठ्यात विविध कारणांमुळे अडथळे येत आहेत, आणि आतापर्यंत आठ ते दहा वेळा पाणीपुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ते उपलब्ध पाण्याचा साठा काळजीपूर्वक वापरावे.
बुधवारी पाणीपुरवठा होणारे भाग: शहरातील ८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या भागात समाविष्ट असलेल्या काही प्रमुख ठिकाणांमध्ये नटराज टाकी ते चौघुले मळा, शनिपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, शाहुनगर, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, साने गुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, नंदनवन नगर, चर्च रोड, प्रभात कॉलनी, ब्रुकब्रॉण्ड कॉलनी, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर, इकबाल कॉलनी, मिल्लतनगर या भागांचा समावेश आहे.