जळगाव मिरर / १४ ऑक्टोबर २०२२
सोशल मीडियावर नेहमी तुम्हाला नवनवीन बातम्या दिसत असतील त्यात काही व्हिडीओ पण असतात, आतापर्यंत तुम्हीं एटीएम मशीन पाहिली असेल ती पैसे देणारी परंतु बंगलोर शहरात चक्क एटीएम मशीन आहे ती इडली देणारी, त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही आजपर्यंत एटीएम चा वापर पैसे काढण्यासाठीच केला असेल . कार्ड इन्सर्ट करून पिन नंबर टाकायचा किती पैसे हवेत तो आकडा टाकला कि झालं ATM मधून एकदम करकरीत नोटा बाहेर येतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता ATM मधून पैशांऐवजी खाण्याच्या वस्तू बाहेर येऊ शकतात तर? हो हे खरं आहे आता तुम्हाला ATM मधून चक्क इडली मिळू शकते जी तुम्ही मनसोक्त खाऊन आपलं पोट भरू शकता.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा याच संदर्भातला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता .इड्लीबोट्स नावाच्या कंपनीने हा उपक्रम केला आहे . तुम्हाला मोबाइलला अँप मधून काय हवेत ते सिलेक्ट करायचं आहे . मशीनवर असलेल्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करा आणि अवघ्या काही मिनिटात गरमागरम इडली आणि वाद व्यवस्थित पॅक करून तुमच्या समोर.. आहे कि नाही भन्नाट आयडिया , विशेष म्हणजे हे इडलीचं ATM तुम्ही कधीही अगदी मध्यरात्रीसुद्धा वापरू शकता . सध्या बंगलोर मध्ये हे atm सुरु करण्यात आलाय कंपनीचा दावा आहे कि लवकरच संबंध मुंबईत आणि इतर शहरांमध्ये ते हे इडली ATM लावतील.